कितीही दबाव आणा, आम्ही फिनिक्स पक्षासारखी भरारी घेणारच; ठाकरेगटातील नेत्याने कार्यकर्त्यांमध्ये जान भरली…
शिवसेना पक्ष आणि चिन्ह आता शिंदेगटाकडे असणार आहे. त्यावर ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाहा व्हीडिओ...
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निवडणूक आयोगाने निर्णय दिला. त्यानुसार शिवसेना पक्ष आणि चिन्ह आता शिंदेगटाकडे असणार आहे. त्यावर ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर त्यांनी टीकास्त्र डागलंय. तुम्ही कितीही शिवसैनिकांना दाबायचा प्रयत्न करा, पण शिवसेना फिनिक्ससारखी भरारी घेईल. मात्र सर्वसामान्य शिवसैनिक उद्धव ठाकरेंसोबत आहे, असं अहिर म्हणाले आहेत. आज प्रादेशिक पक्षाचं अस्तित्व धोक्यात आलंय. दोन दिवस आधी आत्मविश्वासानं सांगत होते की चिन्ह आणि पक्ष आम्हालाच मिळणार आहे. तसंच झालं. म्हणजे कुठेतरी पाणी मुरतंय, असंही त्यांनी म्हटलं आहे.
Latest Videos
पार्थ पवारांवर गुन्हा का नाही?जमीन गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टाचा सवाल
सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'

