मराठा समाज कळण्याऐवढी तुमची बुद्धी नाही, रामदास कदम यांची कुणी काढली अक्कल?
मराठा समाज ज्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अंगावर आला त्यावेळेस अजित पवार यांना डेंग्यूची लागण झाली, अशी टीका एकनाथ शिंदे गटाचे नेते आणि आमदार रामदास कदम यांनी अजित पवार यांच्यावर केली. रामदास कदम यांनी अजित पवार यांच्यासंदर्भात केलेल्या 'त्या' वक्तव्यावर कुणी केली टीका?
मुंबई, १५ नोव्हेंबर २०२३ | मराठा समाज ज्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अंगावर आला त्यावेळेस अजित पवार यांना डेंग्यू झाला, अशी टीका एकनाथ शिंदे गटाचे नेते आणि आमदार रामदास कदम यांनी अजित पवार यांच्यावर केली. रामदास कदम अजित पवार यांच्यावर टीका करताना म्हणाले होते, मराठा समाज ज्यावेळेस एकनाथ शिंदे यांच्या अंगावर आला त्यावेळेस अजितदादांना डेंग्यू झाला. मराठा समाज कधीच कुणाच्या अंगावर जात नसतो आणि गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा समाज राज्यात शांतपणे आंदोलन करत आहे. तर मराठा समाज कळण्याइतपत आपल्याकडे बुद्धी नाही हे जगजाहीर आहे, असे म्हणत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष सचिन खरात रामदास कदम यांच्यावर निशाणा साधला. तर रामदास कदम तुमचे स्नेही गजानन कीर्तीकर यांनी तुमची जागा तुम्हाला दाखवून दिली आहे त्यामुळे उगाच मंत्रीपदासाठी अजित पवार यांच्यावर टीका करू नये, असा खोचक सल्लाही त्यांनी दिला.