AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sachin Waze : मोठी बातमी! तब्बल 5 वर्षांनी सचिन वाझेला जामीन, पण...अँटेलिया प्रकरणात कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

Sachin Waze : मोठी बातमी! तब्बल 5 वर्षांनी सचिन वाझेला जामीन, पण…अँटेलिया प्रकरणात कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

| Updated on: Sep 29, 2026 | 3:29 PM
Share

अँटेलिया स्फोटक प्रकरणात बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेला एनआयए कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. साडेपाच वर्षांच्या तुरुंगवासानंतर हा दिलासा मिळाला असला तरी, मनी लॉन्ड्रिंग आणि सीबीआयच्या गुन्ह्यांसह इतर प्रकरणांमुळे वाझे सध्या तरी तुरुंगातच राहणार आहे.

अँटेलिया स्फोटक प्रकरणात बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेला एनआयए कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, वाझेने या प्रकरणात साडेपाच वर्षांचा कालावधी तुरुंगात घालवल्याने, हा मुद्दा लक्षात घेऊन कोर्टाने त्याला जामीन दिला आहे. या जामीन मंजुरीला एक मोठी घडामोड मानले जात असले तरी, सचिन वाझे सध्या तरी तुरुंगातून बाहेर येणार नाही. त्याच्यावर ईडी आणि सीबीआय यांसारख्या तपास यंत्रणांकडून दाखल असलेल्या मनी लॉन्ड्रिंगसह इतर गंभीर गुन्हे अजूनही प्रलंबित आहेत. या इतर प्रकरणांमध्ये जोपर्यंत त्याला जामीन मिळत नाही, तोपर्यंत तो तुरुंगातच राहणार आहे.

एनआयएने अँटेलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला मुख्य आरोपी मानले होते. तसेच, मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा आरोपही त्याच्यावर होता. सत्र न्यायालयाच्या या निर्णयाला एनआयए हायकोर्टात आव्हान देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची पुढील वाटचाल महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Published on: Sep 29, 2026 03:29 PM

Follow Us