मुंबईतील बलात्कार पीडित महिलेची मृत्यूशी झुंज संपली, अतिरक्तस्रावानं मृत्यू
मुंबईतील साकीनाका (Saki Naka) परिसरात झालेल्या बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या महिलेवर बलात्कार करुन तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घालण्याचा प्रकार घडला होता. या प्रकाराने मुंबई पुन्हा एकदा हादरुन गेली.
मुंबईतील साकीनाका (Saki Naka) परिसरात झालेल्या बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या महिलेवर बलात्कार करुन तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घालण्याचा प्रकार घडला होता. या प्रकाराने मुंबई पुन्हा एकदा हादरुन गेली. या महिलेची प्रकृती गंभीर होती. तिच्यावर मुंबईतील राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु होते. तिथेच तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मोहन चौहानला बेड्या ठोकल्या आहेत.
या महिलेवर 9 सप्टेंबरला रात्री बलात्कार झाला होता. त्यानंतर तिच्या गुप्तांगात सळई घुसवण्याचा प्रयत्न करुन अमानुष अत्याचार केले होते. यामध्ये महिला गंभीर जखमी झाली होती. तिला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पीडित महिलेला व्हेंटिलेटवर ठेवण्यात आलं होतं. महिलेचं आतडे बाहेर आले होते. त्यामुळे डॉक्टरांनी तिच्यावर शस्त्रक्रियाही केली होती. जोपर्यंत तिची प्रकृती स्थिर होत नाही तोपर्यंत तिला दुसऱ्या रुग्णालयात हलवू शकत नाही असं राजावाडी रुग्णालय प्रशासनाने सांगितलं होतं. मात्र आज अखेर या महिलेचा मृत्यू झाला आहे.
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....

