Sambhaji Bhide यांनी घेतली जरांगे पाटील यांची भेट; म्हणाले, ‘हे काम माझ्यावर सोडा, ही लढाई एक घाव दोन तुकडे…’
VIDEO | मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनस्थळी दाखल होत संभाजी भिडे यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, संभाजी भिडे आणि मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीत काय झाली चर्चा? बघा व्हिडीओ
जालना, १२ सप्टेंबर २०२३ | मराठा आरक्षणाच्या मागणीवर गेल्या १४ दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा १५ वा दिवस आहे. दरम्यान, आज जालन्यातील आंदोलनस्थळी मंत्री संदीपाम भुमरे आणि अर्जून खोतकर यांच्यासह संभाजी भिडे पोहोचले होते. संभाजी भिडे अचानक आंदोलनस्थळी पाहून अनेकजण अवाक् झाले आहेत. यावेळी संभाजी भिडे यांनी मनोज जरांगे यांना धीर देत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. भिडे म्हणाले, ‘शिवप्रतिष्ठान तुमच्या पाठिशी आहे. जसं पाहिजे तसं आरक्षण मराठा समाजाला मिळालं पाहिजे. ही लढाई एक घाव दोन तुकड्यांची नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आम्ही सगळे तुमच्या सोबत आहेत. मी इथे दिखाव्यासाठी आलेलो नाही तर हे आरक्षणाचा शब्द पाळून घ्यायचं काम माझ्यावर सोडा’, असेही ते म्हणाले.
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..

