Sandeep Deshapande : अभिजात भाषेचा दर्जा देऊन उपकार केल्याचं.., संदीप देशपांडेंचं मोठं विधान
Sandeep Deshpande News : संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेत हिंदी सक्तीच्या मुद्यावर भाष्य केलं आहे.
उद्धव ठाकरे यांनी जो पुढाकार घेतला आहे त्याला मराठी माणूस म्हणून मी त्यांचा ऋणी राहील कारण मराठी म्हणून आपण एकत्र येणार आहे. राजकीय दृष्ट्या ठाकरे बंधू एकत्र येणार की नाही यासंदर्भात दोन ठाकरे बोलतील मी त्यावर काही बोलणार नाही मी खूप छोटा आहे, असं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हंटलं आहे. ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर आज त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे भाष्य केलं आहे.
पुढे बोलताना संदीप देशपांडे म्हणाले की, अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी साहित्य, ती भाषा समृद्ध असावी असावी लागते. त्या भाषेतील साहित्य समृद्ध असावं लागतं. त्याशिवाय दर्जा मिळत नाही. तुम्ही शक्तीशाली आहात, तर मग गुजरातीला दर्जा करून दाखवा. मोदी असतील किंवा ट्रम्प असतील, गुजरातीला अभिजात दर्जा करून दाखवा. मराठीला भाषा अभिजीत भाषेत दर्जा देऊन उपकार केल्याचे वाटत असेल, तर मग गुजराती भाषेला तोच दर्जा देऊन दाखवा. मुळात मराठी भाषेला दर्जा मिळाल तो तिच्या वैभवामुळे मिळाला आहे, असंही त्यांनी सांगितलं.
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं

