राज ठाकरे-उदय सामंतांच्या भेटीने भुवया उंचावल्या, मनसे नेते म्हणाले..
एकामागोमाग एक असे नेते राज ठाकरे यांची भेट घेताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद् फडणवीस यांनीही राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. त्यातच आज शिवसेना शिंदे गटातील नेते उदय सामंत हेही राज ठाकरेंची भेटीसाठी पोहोचल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले.
राज ठाकरे-उदय सामंत यांच्या भेटीनंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे साहित्य संमेलनासाठी पुण्याला गेले होते, त्याचे धन्यवाद देण्यासाठी उदय सामंत आले होते. ही राजकीय भेट नव्हे तर सदिच्छा भेट होती. त्यांच्या नेहमीप्रमाणे काही गप्पा झाल्या असे देशपांडे म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आज सकाळीच राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थवर पोहोचले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
एकामागोमाग एक असे नेते राज ठाकरे यांची भेट घेताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद् फडणवीस यांनीही राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. त्यातच आज शिवसेना शिंदे गटातील नेते उदय सामंत हेही राज ठाकरेंची भेटीसाठी पोहोचल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. मात्र त्या दोघांची भेट राजकीय नसल्याचे मनसे नेते संदीप देशपांडेनी स्पष्ट केलं. प्रत्येक गोष्ट ही राजकारणाच्या चष्म्यातून बघितली पाहिजे असं नाही, काही गोष्टी या राजकारणाच्या पलीकडेही असतात. ही फक्त सदिच्छा भेट होती असे ते म्हणाले. एकमेकांच्या घरी जाऊन आपण लोकांना भेटतो, ही महाराष्ट्राची परंपरा आहे, त्याचप्रमाणे आजची भेट होत असे देशपांडे यांनी स्पष्ट केलं.
Published on: Feb 22, 2025 11:35 AM
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...

