उगाचंच माझ्या XXX… हे कॅमेऱ्यात रेकॉर्ड करा; संतप्त संजय दीना पाटलांचं थेट पोलीस आयुक्तांना आव्हान
उद्धव ठाकरे गटातून निवडून आल्यानंतर शिंदे सेनेत सामील झालेले ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पत्रकारांनी राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया विचारल्यानंतर संजय दिना पाटील यांनी संताप व्यक्त करत अरेरावीची भाषा वापरली.

“तुम्ही परत इकडे आलात तर मी तुम्हाला मारुन पाठवेन. हे कॅमेऱ्यात रेकॉर्ड करा, तुम्ही उगाच माझ्या गांXXX घालताय, परत आले तर मारून. हे मी तुम्हाला पोलिसांसमोर सांगतोय, तुम्हाला करायचंय ते करा,” असे वक्तव्य संजय दिना पाटील यांनी केले. त्यांच्या या विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या प्रकरणावर आता ठाकरे गटाकडूनही प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. नेते सुनील राऊत यांनी संजय दिना पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. “त्याने स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे,” असे सुनील राऊत म्हणाले.
दरम्यान, या घटनेमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Published on: Jun 25, 2026 02:45 PM
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या