Sanjay Gaikwad : छत्रपती संभाजी महाराज.., ते मूर्ख होते का..; शिंदेंच्या आमदाराचं वादग्रस्त विधान
Sanjay Gaikwad Controvercial Statement : शिंदेंचे आमदार संजय गायकवाड यांनी हिंदी भाषेच्या मुद्यावरून भाष्य करत वादग्रस्त विधान केलेलं आहे.
हिंदीच्या मुद्यावरून बोलताना शिंदेंचे आमदार संजय गायकवाड यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा दाखला देताना संजय गायकवाड यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. तर संजय गायकवाड यांच्या अकलेचं दिवाळं निघालं आहे, असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी जोरदार टीका केली आहे. दरम्यान, छत्रपती शिवरायांनी राजकोष मराठीत केला होता हे संजय गायकवाड विसरले का? असा सवाल बाळा नांदगावकर यांनी उपस्थित केला आहे.
तुम्हाला जगात टिकायचं असेल तर सगळ्या भाषा अवगत झाल्या पाहिजे. छत्रपती संभाजी महाराजांनी 16 भाषा शिकल्या ते मूर्ख होते का? छत्रपती शिवाजी महाराज बहुभाषिक होते, ताराराणी, येसुबाई, जिजाऊ मासाहेब या सगळ्यांनी बहुभाषा शिकल्या, हे सगळे लोक मूर्ख होते का? भाषेच्या मुद्यावरून राजकारण करणं चुकीचं आहे, असं वादग्रस्त विधान संजय गायकवाड यांनी केलेलं असल्याने विरोधक आता गायकवाड यांच्यावर टीकेची झोड उठवत आहेत.

मराठा कार्यकर्ते आणि मंत्री सरनाईक यांच्यात शाब्दिक चकमक, पाहा VIDEO

ती कौटुंबिक मुलाखत, त्यावर .. ; मंत्री प्रताप सरनाईकांचा हल्लाबोल

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 24 जुलैला चक्का जाम, बच्चू कडू यांचा इशारा

जुनी म्हण आहे, मुंबईत ठाकरे..; मनोज जरांगेंचं ठाकरेंच्या युतीवर विधान
