Sanjay Gaikwad Video : ‘अनिल परब म्हणजे शिवरायांच्या पायाची धूळ पण…’, ‘त्या’ वक्तव्यावरून शिवसेनेच्या नेत्याचा घणाघात
अनिल परबांनी असं विधान करत त्यांनी स्वत:ची तुलना छत्रपती संभाजी महाराजांसोबत केली. मात्र त्यांच्या या विधानानंतर आता राज्यभरात संतापाचे वातावरण निर्माण झालं आहे.
‘अनिल परब म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पायाची धूळ पण नाही. तुमची औकात नाही त्यांच्याबरोबर तुलना करायची. वयाच्या नवव्या वर्षी स्वराज्य निर्माण करणारा राजा… अशा राजाशी तुम्ही स्वतःची तुलना करतात’, असं म्हणत शिवसेनेचे नेते संजय गायकवाड यांनी ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्या वक्तव्यावर बोलताना जहरी भाष्य केले आहे. पुढे ते असेही म्हणाले, औरंगजेबाच्या आत्याचाराला तुम्ही ईडीची उपमा देतात. हे सगळं दिवाळखोरीचं लक्षण आहे. यांच्या अक्कला या मेल्यात असं वक्तव्य करत संजय गायकवाड यांनी अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे. दरम्यान, राज्यातील महापुरूषांचा अपमान करणाऱ्यांची साखळीच आता सुरू झाली आहे, अशा लोकांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी करत असताना अनिल परब हे स्वतःची तुलना संभाजीराजे यांच्यासोबत करून शिवरायांचा अपमान करत असल्याचेही संजय गायकवाड यांनी म्हटले आहे. ‘छत्रपती संभाजी महाराजांनी धर्म बदलावा म्हणून त्यांचा छळ झाला आणि पक्ष बदलावा म्हणून माझा छळ झाला’, असं वक्तव्य काल राज्यपांलाच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान अनिल परब यांनी केलं होतं. त्यावर आज प्रतिक्रिया देताना संजय गायकवाड यांनी अनिल परबांचा खरपूस समाचार घेतला आहे.

कोरटकर थांबलेल्या हॉटेलांना नोटिस दिली; पोलिसांची कोर्टात माहिती

कराड-मुंडेंच्या सांगण्यावरून देशमुखांची हत्या,ठाकरेंच्या नेत्याचा आरोप

बंगरुळू हत्या प्रकरण : आरोपीच्या वडिलांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

देशमुखांच्या हत्येचं शूटींग ज्या फोनमधून केल, त्याचा तपासणी अहवाल समोर
