आधी गंभीर आरोप आता म्हणताय, चंद्रशेखर बावनकुळे यांचं बरोबर…, नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
कॅसिनो प्रकरणानंतर चंद्रशेखर बावनकुळे पहिल्यांदाच मीडियासमोर... यावर संजय राऊत यांचा पलटवार, म्हणाले... आमच्यावर आमच्या कुटुंबीयांवर, आमच्या नेत्यांवर हल्ले करताय, ते कोणत्या संस्कृतीमध्ये बसतेय, ती देखील विकृती असल्याचे म्हणत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना खोचक टोला लगावला आहे.
मुंबई, २२ नोव्हेंबर २०२३ : गेल्या ३४ वर्षांपासून राजकारणात आहे. फोटोवरून कुणाची इमेज खराब करता येत नाही, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. कॅसिनो प्रकरणानंतर चंद्रशेखर बावनकुळे पहिल्यांदाच मीडियासमोर आले आणि त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. तर यानंतर संजय राऊत म्हणाले, चंद्रशेखर बावनकुळे यांचं बरोबर आहे. हे त्यांनी त्यांच्या पक्षातील सहकाऱ्यांना सांगावं. राजकीय विरोधकांची इमेज खराब करताय, त्या पक्षातील नेत्यांनी देखील ४०-५० वर्ष राजकारण आणि समाजकारणात घालवली आहे. तुम्हीच नाही घासली आम्हीही घासली… आमच्यावर आमच्या कुटुंबीयांवर, आमच्या नेत्यांवर हल्ले करताय, ते कोणत्या संस्कृतीमध्ये बसतेय, ती देखील विकृती असल्याचे म्हणत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना खोचक टोला लगावला आहे.
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?

