शिवसेनेची स्थापना, मुद्दा ठरणार?, कायदेतज्ज्ञांना काय वाटतं? पाहा स्पेशल रिपोर्ट…
शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर घेणार आहेत. मात्र ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आता नवा मुद्दा उपस्थित केला आहे. भाजपाने शिवसेनेच्या वर्धापन दिनावरून ठाकरे गटाला टोला लगावला. यावर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं.
मुंबई : शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर घेणार आहेत. मात्र ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आता नवा मुद्दा उपस्थित केला आहे. भाजपाने शिवसेनेच्या वर्धापन दिनावरून ठाकरे गटाला टोला लगावला. यावर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं. भाजपाने उठाठेव करायची गरज नाही. त्यांनी आमचं वकीलपत्र कधी घेतलं?. शिवसेनेचा वर्धापन दिन दणक्यात साजरा करू. मुळात एकनाथ शिंदे यांनी शिवसेना कधी स्थापन केली? त्यांच्याबरोबर जे काही ४० लोक वगैरे आहेत त्यांनी शिवसेना कधी स्थापन केली? शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केली. त्यांनी उद्धव ठाकरे यांची पक्षाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. पक्षाच्या कार्यकारिणीच्या मताने त्यांनी उद्धव ठाकरेंकडे पक्षाची धुरा सोपवली आहे. शिवसेना ही ठाकऱ्यांची आहे, असं संजय राऊत म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची स्थापना केली का? हा मुद्दा आता अपात्रतेच्या सुनावणीत येणार का? कायदेतज्ज्ञ यावर काय बोलतात यासाठी पाहा या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट…
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..

