Sanjay Raut : बाळासाहेब ठाकरेंची आणीबाणीचं समर्थन केलं होतं – संजय राऊत
Sanjay Raut News : संजय राऊत यांनी आणीबाणीवरून भाजप सरकारवर टीका केली आहे.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आणीबाणीचं जाहीरपणे समर्थन केलं होतं, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हंटलं आहे. आमच्या मार्मिक साप्ताहिकावर त्यावेळी धाडी टाकून आमचा प्रेस बंद केली होती. तरी देखील आम्ही समर्थन दिलं होतं, कारण आणीबाणी शिस्त लावणारी व्यवस्था होती, असंही यावेळी राऊत म्हणाले.
पुढे राऊत यांनी सांगितलं की, संविधान हत्या हे म्हणत आहेत, भारतीय घटनेमध्ये भारतीय घटनेतील तरतुदीनुसार जेव्हा देशांमध्ये अशांतता, अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न होतो, अराजकता निर्माण करण्यासाठी काही शक्ती काम करतात तेव्हा अशा प्रकारे आणीबाणी जाहीर करून देशावर नियंत्रण मिळवण्यासाठी संविधानिक तरतूद भारतीय संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली घटनापिठाने दिलेली आहे. याचा अभ्यास या लोकांनी केला पाहिजे. इंदिरा गांधींनी आणीबाणी कायदेशीर मार्गाने लावले होते. त्यांनी यासंदर्भात संसदेचं विशेष अधिवेशन घेतलं होतं. गेल्या दहा वर्षात घोषित आणीबाणी लाभले गेलेले आहे, असंही राऊत म्हणाले.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

