…तरच भाजपचा भगवा खरा, बेळगाव महापालिका निवडणुकीवरुन संजय राऊतांंचं नवं आव्हान

बेळगाव महापालिकेवर भगवाच फडकला असा दावा करताय तर मग बेळगाव महाराष्ट्रात विलीन करण्याचा ठराव पालिकेच्या पहिल्याच सभेत पारित करा, असं आव्हानच संजय राऊत यांनी भाजपला दिलं आहे.  

बेळगाव महापालिकेवर भगवा झेंडाच फडकला आहे असा दावा भाजपने केला आहे. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र केलं आहे. बेळगाव महापालिकेवर भगवाच फडकला असा दावा करताय तर मग बेळगाव महाराष्ट्रात विलीन करण्याचा ठराव पालिकेच्या पहिल्याच सभेत पारित करा, असं आव्हानच संजय राऊत यांनी भाजपला दिलं आहे.

संजय राऊत यांनी ट्विट करून हे आव्हान दिलं आहे. बेळगावात एकीकरण समितीचा पराभव घडवून आणला. भाजपाचे महाराष्ट्रातील पुढारी म्हणतात आमचा भगवा बेळगावर फडकला. मग एक करा. पालिकेच्या पहिल्या सभेत बेळगाव महाराष्ट्रात विलीन करण्याचा ठराव मंजूर करा. महाराष्ट्रात पेढे वाटून आनंद व्यक्त करणाऱ्या भाजपाने लगेच ही मागणी करावी. तरच तुमचा भगवा खरा!, असं आव्हानच राऊत यांनी दिलं आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI