Video : निवडणुकीत कुणीही घोडे बाजार करू नये, संजय राऊतांचं आवाहन
स्वराज्य पक्षाचे नेते संभाजी छत्रपती (sambhaji chhatrapati) यांनी राज्यसभेच्या निवडणुकीतून (rajya sabha election) माघार घेतली. त्यानंतर भाजपने (bjp) फक्त दोनच उमेदवारांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. त्यामुळे सहाव्या जागेचे शिवसेनेचे उमेदवार संजय पवार बिनविरोध निवडून येतील अशी चर्चा रंगली. पण ही चर्चा अल्पकाळच चालली. कारण भाजपने तिसऱ्या जागेसाठी कोल्हापूरचेच नेते धनंजय महाडिक यांच्या नावाची घोषणा केली. इतकेच नाही […]
स्वराज्य पक्षाचे नेते संभाजी छत्रपती (sambhaji chhatrapati) यांनी राज्यसभेच्या निवडणुकीतून (rajya sabha election) माघार घेतली. त्यानंतर भाजपने (bjp) फक्त दोनच उमेदवारांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. त्यामुळे सहाव्या जागेचे शिवसेनेचे उमेदवार संजय पवार बिनविरोध निवडून येतील अशी चर्चा रंगली. पण ही चर्चा अल्पकाळच चालली. कारण भाजपने तिसऱ्या जागेसाठी कोल्हापूरचेच नेते धनंजय महाडिक यांच्या नावाची घोषणा केली. इतकेच नाही तर महाडिक यांनी आज उमेदवारी अर्ज भरून विजयाचा दावाही केला. आपले वरिष्ठ नेतेही अपक्षांशी चर्चा करत असल्याचा मोठा गौप्यस्फोट महाडिक यांनी केला. त्यामुळे शिवसेनेच्या पोटात गोळा आला नसता तर नवलच. त्यामुळे कधी नव्हे तर शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज दिवसभरात मीडियाशी तीनवेळा संवाद साधला. या तिन्हीवेळेस घोडेबाजारावर राज्य सरकारचं, मुख्यमंत्र्यांचं आणि गृहखात्याचं लक्ष असल्याचं सांगितलं. तिन्ही वेळेस राऊत यांनी एकच गोष्ट वारंवार सांगितल्याने आघाडीला अपक्ष आमदार फुटीची भीती असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे तर्कवितर्क लढवले जात आहेत.
पार्थ पवारांवर गुन्हा का नाही?जमीन गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टाचा सवाल
सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'

