धनकड बेपत्ता झालेच, पण राजीव कुमारही..; राऊतांचा खळबळजनक दावा
संजय राऊत यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील तत्कालीन मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्याबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत.
2024 च्या निवडणुकीमध्ये राजीव कुमार हे निवडणूक आयुक्त होते मी काल एक ट्विट केला आहे. निवडणूक आयुक्तांना 2024 साली जे निवडणूक आयुक्त होते आणि ज्यांच्या सहकार्याने नरेंद्र मोदी आणि त्यांच्याबरोबर निवडणुका जिंकू शकले ते निवडणूक आयुक्त राजीव कुमार कुठे आहेत हा माझा पहिला प्रश्न जगदीश धनकड बेपत्ता झाले आहेत तसे ते तत्कालीन निवडणूक आयुक्त राजीव कुमार कुठे आहेत हा माझा प्रश्न आहे ते कुठे गेले? असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हंटलं आहे. आज पत्रकारांशी संवाद साधतांना त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे.
यावेळी पुढे बोलताना राऊत म्हणाले की, राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर हल्ले सुरू केल्यापासून खरं म्हणजे त्याचा उत्तर राजीव कुमार यांनी दिले पाहिजे तेव्हा राजीव कुमार हे निवडणूक आयुक्त होते त्यांनी शिवसेना हे नाव आणि चिन्ह धनुष्यबाण हे शिंदे गटाला दिला गद्दारांना दिला घटने विरुद्ध जाऊन आणि त्यात किती कोटीचा व्यवहार झाला हे देखील मी सांगितलं ते राजीव कुमार कुठे आहेत हा माझा प्रश्न आहे मी त्याच्या संदर्भात सोशल मीडिया वरती माझा प्रश्न टाकला आहे त्याच्यावर दिल्लीमध्ये सुद्धा चर्चा सुरू आहे जगदीश धनगड सुद्धा दिसत नाही आहेत. राहुल गांधी यांनी हल्ला सुरू केल्यापासून आम्ही सगळ्यांनी निवडणूक आयोगावर हल्ला सुरू केल्यापासून मत चोरी प्रकरणात 2024 पासून हे तेव्हाचे आयुक्तांना सुद्धा लोकांशी बोलण्यापासून मत व्यक्त करण्यापासून थांबवला आहे कदाचित त्यांना दिल्लीतही आता ठेवलेले नाही, असंही राऊतांनी म्हंटलं.
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..

