Sanjay Raut : हे सगळे ढोंगी, देशाला मूर्ख बनवताय… भारत-पाक सामन्यावरून राऊतांचा हल्लाबोल केला एकच सवाल
भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याबाबतही राऊत यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानच्या मौसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिल्याने राऊत यांनी याला नौटंकी म्हटले. जर देशाचा पाकिस्तानसोबत खेळायला विरोध असेल, तर सामने खेळलेच का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याला देशाचा विरोध असतानाही हा सामना खेळल्याने संजय राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. भारतीय कर्णधारांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला या कृतीला त्यांनी नौटंकी संबोधले. “मैदानावर तुम्ही एकत्र खेळता, पण नंतर ट्रॉफी स्वीकारण्यास नकार देता, हे देशाला मूर्ख बनवण्यासारखे आहे”, असे राऊत म्हणाले. पंधरा दिवसांपूर्वी याच भारतीय संघाने मोहसीन नक्वी यांच्यासोबत फोटो काढले होते आणि हस्तांदोलन केले होते, याची आठवण त्यांनी करून दिली. पंतप्रधान किंवा भाजपच्या लोकांकडून देशाला मूर्ख बनवण्याची प्रेरणा घेतली आहे का, असा सवालही त्यांनी विचारला. हा सामना खेळणे हे हुतात्म्यांच्या रक्ताचा अपमान असल्याचे त्यांनी म्हटले.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

