केंद्राकडे ईडी, सीबीआय असली तर आम्ही घाबरत नाही, या अंगावर : संजय राऊत

उत्तर प्रदेश, गोव्यात निवडणूक लढत आहोत. दादरा नगर हवेलीची जागा जिंकली आहे. दक्षिण गुजरातमध्ये आम्ही काम सुरु केलं आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत. आम्हाला आज यश नाही मिळालं तरी उद्या नक्कीचं मिळेल असं संजय राऊत म्हणाले.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Yuvraj Jadhav

Jan 24, 2022 | 11:25 AM

भाजपसोबत आम्ही पंचवीस वर्ष काढली. भाजपला आम्ही युतीचा धर्म पाळला. इतिहास त्याला साक्ष आहे. जे झालं ते झालं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ती सल बोलून दाखवली आहे. भाजपसोबत जे पक्ष गेले त्या सर्व पक्षांना राजकीय किंमत चुकवावी लागली. मगोप, अकाली दल, जयललिता यांचा पक्ष आणि चंद्राबाबू नायडू यांची टीडीप यांना किंमत चुकवावी लागली आहे. मात्र, शिवेसना त्याला अपवाद आहे. आम्ही आता इतर राज्यांमध्ये निवडणूक लढणार आहोत. उत्तर प्रदेश, गोव्यात निवडणूक लढत आहोत. दादरा नगर हवेलीची जागा जिंकली आहे. दक्षिण गुजरातमध्ये आम्ही काम सुरु केलं आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत. आम्हाला आज यश नाही मिळालं तरी उद्या नक्कीचं मिळेल असं संजय राऊत म्हणाले.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें