या डबक्यात फडणवीसांनी उतरू नये, त्यांची अप्रतिष्ठा होईल- संजय राऊत

देवेंद्र फडणवीस यांच्या चांगला विरोधी पक्ष नेता व्हायची क्षमता आहे त्यांनी या विरोधकांनी तयार केलेल्या डबक्यात उतरू नये. त्यांची प्रतिष्ठा कमी होईल.

रचना भोंडवे

|

Jun 28, 2022 | 10:59 AM

मुंबई: बंडखोरांविरोधात लोकांच्या भावना तीव्र आहेत. 11 जुलैनंतर बंडखोरांना महाराष्ट्रात (Maharashtra) यावंच लागेल. सध्या महाराष्ट्रात त्यांचं काहीच काम नाही असं वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shivsena Sanjay Raut) यांनी केलंय. त्याचबरोबर 12 आमदारांची यादी (MLA List) कुठल्या झाडाझुडपात पडलीये असंही ते म्हणालेत. बंडखोरांनी एक डबकं तयार केलंय,डबक्यात बेडूक राहतो. देवेंद्र फडणवीस यांच्या चांगला विरोधी पक्ष नेता व्हायची क्षमता आहे त्यांनी या विरोधकांनी तयार केलेल्या डबक्यात उतरू नये. त्यांची प्रतिष्ठा कमी होईल. त्यांचीच काय तर पंतप्रधान आणि त्यांच्या पक्षाचीही अप्रतिष्ठा होईल असं संजय राऊत म्हणालेत.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें