AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निवडणूक आयोगाच्या कारभारावर राऊतांचा सवाल; थेट मनमानी केल्याचा आरोप

निवडणूक आयोगाच्या कारभारावर राऊतांचा सवाल; थेट मनमानी केल्याचा आरोप

| Updated on: Sep 23, 2026 | 11:13 AM
Share

संजय राऊत यांनी ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप करत दावा केला आहे की ते मनमानी, हुकूमशाही आणि बेईमान पद्धतीने काम करत आहेत. राऊत यांच्या म्हणण्यानुसार, ज्ञानेश कुमार यांनी फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल केले आहेत आणि त्यांच्या विरोधात कॅबिनेट सेक्रेटरीपर्यंत तक्रारी करण्यात आल्या आहेत.

संजय राऊत यांनी ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप करत दावा केला आहे की ते मनमानी, हुकूमशाही आणि बेईमान पद्धतीने काम करत आहेत. राऊत यांच्या म्हणण्यानुसार, ज्ञानेश कुमार यांनी फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल केले आहेत आणि त्यांच्या विरोधात कॅबिनेट सेक्रेटरीपर्यंत तक्रारी करण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगाचा कारभार अत्यंत गैरकायदेशीरपणे चालवला जात असून, हे देशाच्या लोकशाहीसाठी घातक असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. राऊत यांनी थेट गृहमंत्री अमित शहांवरही निशाणा साधला. त्यांच्या मते, निवडणूक आयोग गृह खात्याच्या अंतर्गत येत असल्याने ज्ञानेश कुमार

अमित शहांच्या सूचनेनुसार आणि दबावाखाली काम करत आहेत. ही लोकशाहीच्या हत्येची गुन्हेगारी कृती आहे, असा आरोप राऊत यांनी केला. त्यांनी अमित शहांना या कृत्याचे मुख्य गुन्हेगार ठरवत, पंतप्रधान मोदींनी त्यांना गृहखात्यातून आणि मंत्रिमंडळातून तात्काळ बरखास्त करावे अशी मागणी केली. तसेच, ज्ञानेश कुमार यांनाही बरखास्त करून त्यांच्यावर खटला चालवावा असे राऊत म्हणाले.

Published on: Sep 23, 2026 11:13 AM

Follow Us