Prasad Lad | संजय राऊत शिवसेनेचे प्रवक्ते की राष्ट्रवादीचे प्रवक्ते ? प्रसाद लाड यांचा सवाल

ईडीचा ससेमिरा मागे लागल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून अज्ञातवासात गेलेले शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्रं लिहिलं आहे. भाजपशी युती केल्यावर शिवसेनेला फायदा होईलच. शिवाय आमच्या सारख्यांना होणारा त्रासही वाचेल, असा दावाही सरनाईक यांनी केला आहे. दरम्यान प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. संजय राऊत शिवसेनेचे प्रवक्ते की राष्ट्रवादीचे प्रवक्ते असा सवाल त्यांनी विचारला आहे.

ईडीचा ससेमिरा मागे लागल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून अज्ञातवासात गेलेले शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्रं लिहिलं आहे. या पत्रात प्रताप सरनाईक यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेना कमकुवत करत असल्याचा दावा करतानाच भाजपशी जुळवून घेण्याचं आवाहन केलं आहे. भाजपशी युती केल्यावर शिवसेनेला फायदा होईलच. शिवाय आमच्या सारख्यांना होणारा त्रासही वाचेल, असा दावाही सरनाईक यांनी केला आहे. दरम्यान प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. संजय राऊत शिवसेनेचे प्रवक्ते की राष्ट्रवादीचे प्रवक्ते असा सवाल त्यांनी विचारला आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI