राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी…
उद्धव ठाकरे यांनी बंडखोरी करणाऱ्या खासदारांविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून सध्या ते विविध मतदारसंघांचे दौरे करत आहेत. काल त्यांनी यवतमाळ येथे सभा घेतली होती, तर आज सकाळी परभणी मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर ठाकरे धाराशिव दौऱ्यावर पोहोचले असून येथेही मोठी सभा पार पडत आहे.

या सभेत खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर टीका करताना खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला. “या भामट्याची किंमत इतर खासदारांपेक्षा जास्त होती. कारण कार्यकर्ते याच्यासाठी किडन्या विकून पैसे द्यायला तयार होते, तरीही हा गेला,” असे वक्तव्य राऊत यांनी केले. तसेच त्यांनी ओमराजे निंबाळकर आणि त्यांच्या कुटुंबावर भ्रष्टाचाराचे आरोपही केले.
पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचाही उल्लेख करत राऊत यांनी गंभीर आरोप केले. त्यांनी थेट आरोप केला आहे की याच्या वडिलच्या नावानं स्थापन केलेल्या मल्टीस्टेटमध्ये याने कोट्यावधींचा घोटाळा केला… 500 फ्लॅट घेतले अवैध काम केलं घोटाळे केले आता याच्यामागे इडी लागली तर त्यांनी पळ काढला. “इतकी वर्ष आम्ही एका सापाला दूध पाजलं,” अशी टीकाही त्यांनी केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण पुन्हा तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Published on: Jun 28, 2026 06:22 PM
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी