तर मुंबईच्या मिठी नदीत प्रेते तरंगताना दिसली असती; संजय राऊत यांनी भाजपला सुनावले
'कोरोना काळात उद्धव ठाकरे आणि मुंबई महापालिकेच्या प्रशासनाने महत्त्वाचे निर्णय घेतले म्हणून नाहीतर मुंबईतील मिठी नदीत प्रेते दिसली असती'
मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची ईडी मार्फत चौकशी सुरू आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तुमच्या हातात सत्ता आहे. त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणाही आहेत. त्यामुळे बदनामीच्या मोहिमा राबवल्या जात आहेत. ज्या प्रकारचा हल्लाबोल सुरू आहे, त्यावरून हे स्पष्ट दिसतंय, असं राऊत म्हणाले.
पुढे ते असेही म्हणाले की, मुंबईत उत्तर प्रदेशप्रमाणे गंगेत प्रेते तरंगले नाहीत, कोरोना काळात उद्धव ठाकरे आणि मुंबई महापालिकेच्या प्रशासनाने महत्त्वाचे निर्णय घेतले. हे उद्धव ठाकरेंचे मोठे यश आहे. नाही तर मिठी नदीत प्रेते दिसली असती. पारदर्शक व्यवहार झालेत. गुजरातमध्ये मृतदेहाना स्मशान भूमीत जागा मिळत नव्हत्या. सरकारने, भाजपने आभार मानले पाहिजे, असे म्हणत राऊत यांनी भाजपला सुनावले.

