Sanjay Raut : एकनाथ शिंदे आता कुठे लपून बसले आहेत? संजय राऊत कडाडले
Sanjay Raut Full Press : संजय राऊत यांनी हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.
फडणवीस यांचे सरकार काय चर्चा करेल हा त्यांचा प्रश्न आहे. वास्तविक त्यांना या विषयावर काही भूमिकाच नाही. ते दिल्लीचा खुळखुळा वाजवत आहेत. शिवसेना म्हणून घेणारे एकनाथ शिंदे आणि मंडळींचे मला आश्चर्य वाटत आहे. अशावेळी ते कुठे लपून बसले आहेत? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला आहे. राज्यातील शाळांना हिंदी भाषेच्या सक्ती विरोधात ठाकरे बंधूंनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. त्यावरूनच आज संजय राऊत यांनी भाष्य करत एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.
यावेळी पुढे बोलताना राऊत म्हणाले की, उदय सामंत कोणती भूमिका मांडतात? त्यांनी ठामपणे मराठी माणसाची भूमिका मांडायला हवी. सर्व विरोध झुगारून त्यांनी मराठी भाषा, मराठी अस्मितेवर ठामपणे बोलायला हवे, असे आवाहन देखील संजय राऊत यांनी केले आहे. शिंदे आता कुठे लपून बसले आहेत? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला.
अनिल पाटील अजितदादांच्या भेटीला, गळ्यात क्रीडा मंत्रिपदाची माळ पडणार
मुनगंटीवारांच्या विधानानं चंद्रपूरवरून भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला
CCI केंद्रावरील कर्मचाऱ्याला खोतकरांनी झापलं, शेतकऱ्यांना इंग्रजीत msg
ठाकरे बंधूंचं ठरलं! युतीची उद्या घोषणा, 'या' 7 पालिकांसाठी एकत्र लढणार

