ममता बॅनर्जींनी वाघिणीप्रमाणं लढून लांडग्यांना पळवून लावलं, संजय राऊतांची प्रतिक्रिया

ममता बॅनर्जी या खूप मोठ्या नेत्या आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री असून त्यांनी वाघीणीप्रमाणं लढून लांडग्यांना पळवून लावलं आहे. ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांची भेट देशाच्या राजकारणासाठी महत्त्वाची आहे.

ममता बॅनर्जी ज्यावेळी मुंबईत येतात त्यावेळी त्या ठाकरे कुटुंबाची भेट घेतात. ममता बॅनर्जींचं मी आणि आदित्य ठाकरे यांनी स्वागत केलं आहे. ममता बॅनर्जी यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी त्यांनी प्रार्थना केली.  उद्धव ठाकरे यांच्या नेत्तृत्वात महाराष्ट्र सरकारी यंत्रणांच्या दहशतवादाला पुरुन उरला आहे. ममता बॅनर्जी यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणी जागवल्या.

ममता बॅनर्जी या खूप मोठ्या नेत्या आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री असून त्यांनी वाघीणीप्रमाणं लढून लांडग्यांना पळवून लावलं आहे. ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांची भेट देशाच्या राजकारणासाठी महत्त्वाची आहे. शरद पवार देशाचे मोठे नेते आहेत.पश्चिम बंगालमध्ये डावे भूईसपाट झाले, काँग्रेस संपलेला आहे. भाजपच्या बँड बाजातील हवा ममता बॅनर्जींनी काढून घेतली. ममता बॅनर्जी या मूळच्या काँग्रेसच्या नेत्या आहेत. काही वाद झाल्यानं त्या बाहेर पडल्या आहेत. मात्र, सर्वांना घेऊन पुढं जावं लागेल, असं संजय राऊत म्हणाले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI