Sanjay Raut : कुणाच्या म्हणण्यावर सेना चालत नाही, संजय राऊतांचा टोला नेमका कुणाला?
शिवसैनिक म्हणवून घेणाऱ्या लोकांना वाईट वाटून घेण्याचं कारण नाही, असा टोलाही संजय राऊत यांनी शिंदे यांच्या गटाला लगावलाय. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या घेतलेल्या मुलाखतीवर भाष्य केलंय.
मुंबई : ‘कुणाच्या म्हणण्यावर सेना चालत नाही, मनसेबद्दल मुलाखतीत काहीच नाही, मुलाखतीचा फक्त एक भाग आलाय, पूर्ण मुलाखत होऊ द्या, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांच्या घेतलेल्या मुलाखतीवर दिली आहे. आज त्यांनी यावर भाष्य केलंय. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांनी लोकांच्या मनातील प्रश्नांना उत्तर दिल्याचं म्हटलंय. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी आणि उलथापालथ यावर त्यांनी भाष्य केल्याचंही राऊत म्हणालेत. शिवसैनिक म्हणवून घेणाऱ्या लोकांना वाईट वाटून घेण्याचं कारण नाही, असा टोलाही शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला लगावला आहे. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घेतलेल्या मुलाखतीवर (Udhhav Thackeray Interview) भाष्य केलंय. तर याचदरम्यान त्यांनी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनीया गांधी यांची ईडी चौकशी, शिवसेना उपनेते अर्जुन खोतकर यांची आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्या भेटीवरही भाष्य केलंय.
Published on: Jul 26, 2022 11:00 AM
विधानसभा अध्यक्षांनी अधिकारांची...शिवसेनेच्या सुनावणीत काय काय घडलं?
केरळम्'चे गृहमंत्री पदाचा फायदा घेतात हे... चंद्रशेखर बावनकुळे संतापले
रस्ते आहेत, अपघात होणारच; बालकाच्या मृत्यूनंतर नेत्याचं धक्कदायक विधान
मुंबईकरांनो सावधान! 4 हजारहुन अधिक... मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोस

