Special Report | डेकोरेटरवरून Sanjay Raut V/s Kirit Somaiya -TV9
पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा संजय राऊत यांनी थेट चॅलेंज केलंय. माझा आवाज दाबण्यासाठी, आपल्या वरील आरोप उघड होऊ नये, यासाठी माझ्यावर भ्याड हल्ला करण्यात आल्याचं किरीट सोमय्या यांनी म्हटलंय.
पुणे : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्यावरुन भाजप नेत्यांनी गंभीर आरोप केलेत. या हल्ल्याला आता आठवडा लोटल्यानंतर शुक्रवारी किरीट सोमय्या पुन्हा पुण्यात दाखल झाले होते. यावेळी त्यांनी पुणे पालिका आणि महापौरांची भेट घेतली आणि लाईफलाईन कंपनीविरोधात घोटाळ्याचा आरोपांवरुन चर्चा केली. दरम्यान, यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा संजय राऊत यांनी थेट चॅलेंज केलंय. माझा आवाज दाबण्यासाठी, आपल्या वरील आरोप उघड होऊ नये, यासाठी माझ्यावर भ्याड हल्ला करण्यात आल्याचं किरीट सोमय्या यांनी म्हटलंय. ‘अरे हात पाय तोडा पण किरीटला गप्प बसवा’, असे आदेश ठाकरेंनी दिले असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय. पुण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संजय राऊतांवर तिखट शब्दांत सोमय्यांनी टीका केली आहे.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
BMC निवडणुकीसाठी मनसे अॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी

