‘बारामतीचं कोणी गुजरात करु पहात असेल तर…,’ काय म्हणाले संजय राऊत
बारामतीच्या इंदापूर येथील महाविकास आघाडीच्या शेतकरी मेळाव्यात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची तोफ धडाडली. इंदापूरात सध्या धमक्यांचे सत्र सुरु आहे. महाराष्ट्र अशा धमक्यांना घाबरत नाही. तुम्ही जर विकास कामे केली आहेत तर विकास कामांवर बोला असाही टोला संजय राऊत यांनी यावेळी लगावला.
इंदापूर : बारामतीची लढाई ही महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई आहे. ही केवळ शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची लढाई नाही. बारामतीचं कुणी गुजरात करु पहात असेल तर शिवसेनेचा भगवा येथे ठामपणे उभा आहे. तुम्हाला लढायचे असेल तर विकासाच्या मुद्द्यावर लढा. परंतू ज्याच्या पायाखालची वाळु सरकते. आणि ज्याला पराभरावाची भीती वाटू लागतो तोच धमक्यांवर येतो अशी टीका शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी इंदापूरातील महाविकास आघाडीच्या शेतकऱ्यात केली. सुप्रिया सुळे यांचे भाषण वाचले, त्यात त्या म्हणाल्या की त्यांनाही भीती वाटतेय की त्यांना अटक करतील. योगेश पवार, युगेंद्र यांना अडवून सांगितले जातंय तुम्ही प्रचार करू नका. तुम्हाला लढायचे असेल तुमच्या कामावर लढा. राजकारणातला माणूस विकासावर बोलतो. देवेंद्र फडणवीस परवा म्हणाले मी पुन्हा आलो पण दोन-दोन पक्ष फोडून आलो, काय पण क्वालीफिकेशन आहे असा टोला संजय राऊत यांनी यावेळी लगावला.
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

