Sanjay Shirsat : 67 कोटींचं हॉटेल खरेदी प्रकरण; लिलावातून बाहेर पडणार, शिरसाट यांची माहिती
Sanjay Shirsat Press Conference : हॉटेल खरेदी व्यवहार प्रक्रियेत विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांनंतर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी यातून बाहेर पडणार असल्याचा निर्णय पत्रकार परिषदेत जाहीर केला आहे.
मी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देतो. परंतु हे जे दलाल फिरत आहेत ते कोणासाठी फिरत आहेत त्याचा छडा लावा आणि आजपासून उद्या माझ्या मुलाला ते टेंडरची जी काही प्रोसेस आहे, पत्र द्यायला लावतोय आणि त्या प्रकरणातून बाजूला होतोय, असं शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी म्हंटलं आहे. छत्रपती संभाजीनगर मधील व्हिट्स हॉटेल लिलाव प्रकरणी संजय शिरसाट यांच्यावर शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांकडून बाजार मूल्यापेक्षाही कमी किमतीत लिलाव करून हे हॉटेल विक्री केल्याचा गंभीर आरोप केला जात आहे. त्यावर आज पालकमंत्री शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेऊन या लिलाव प्रक्रियेतून माघार घेत असल्याचं जाहीर केलं आहे.
यावेळी शिरसाट यांनी सांगितलं की, लिलाव होण्याची ही पहिली वेळ नसून ही आठवी वेळ होती. तसंच 67 कोटी जी काही रक्कम सांगितली गेली होती ती कोर्टानेच सांगितलेली रक्कम होती. मुळात ज्यावेळी हॉटेल खरेदी होईल, त्यावेळी सगळा व्यवहार हा व्हाइटमध्ये दिसेल. 110 कोटी रक्कम त्यांनी कुठून आणली? 67 कोटी रुपयांचा रुपयांचा विषय आहे. आरोप करण्यापूर्वी वस्तुस्थिती समजून घ्या, असंही त्यांनी यावेळी म्हंटलं.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले

