“उद्धव ठाकरे बोलतात तेव्हा भाजपच्या पोटात गोळा येतो”, संजय राऊत यांचा घणाघात
ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत उद्या प्रसिद्ध होणार आहे. या मुलाखती टीझर रिलीज करण्यात आला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे.
नवी दिल्ली, 25 जुलै 2023 | ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत उद्या प्रसिद्ध होणार आहे. या मुलाखती टीझर रिलीज करण्यात आला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, “उद्या मुलाखत येईल. त्यापूर्वीच टीका करायला लागलेत. उद्धव ठाकरे यांच्या या मुलाखतीत अनेक गौप्यस्फोट होतील. मुलाखत येण्याआधीच मुलाखतीची चर्चा सुरू होतेय. टीका करणाऱ्यांना काही उद्योग नाहीत का? निधी वाटप सुरू आहे. त्यावर बोला. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीची चर्चा ती प्रसिद्ध होण्यापूर्वी सुरु होते. उद्धव ठाकरे बोलू लागतात तेव्हा शिवसेनेला संपवलं हे सांगणाऱ्यांच्या पोटात सर्वात आधी गोळा येतो.”
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश

