ज्ञानोबा माऊली… तुकाराम! माऊलींचा पहिला रिंगण सोहळा उत्साहात पार; पंढरपूरकडे पालखीचे भव्य प्रस्थान
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पालखी सोहळ्याला आज नेवासे येथून भक्तिमय वातावरणात पुढील टप्प्याची सुरुवात झाली. संत ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेवासे येथून पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान केले असून, हजारो वारकरी आणि भाविकांच्या उपस्थितीत संपूर्ण परिसर विठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमून गेला.

यावेळी माउलींच्या कर्मभूमीत पार पडलेला पहिला रिंगण सोहळा अत्यंत उत्साहात आणि पारंपरिक भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. रिंगण सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी नेवासे तसेच पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
‘ज्ञानोबा-तुकाराम’ आणि ‘विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल’च्या अखंड गजरात पालखीने पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले. टाळ-मृदुंगाच्या निनादात आणि फुगड्या, अभंगांच्या सुरावटीत वारकरी भक्तिभावाने मार्गक्रमण करत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
दरम्यान, पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सुरक्षा, वाहतूक आणि वारकऱ्यांच्या सोयीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. पुढील मुक्कामांदरम्यानही मोठ्या संख्येने भाविक सहभागी होण्याची शक्यता असून, संपूर्ण पालखी मार्गावर भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
Published on: Jul 09, 2026 02:40 PM
ज्ञानोबा माऊली... तुकाराम! माऊलींचा पहिला रिंगण सोहळा उत्साहात पार
मुख्यंत्र्यांना हिंदी बाबत एवढी आस्था का? विधानभवनातील 'ते' वाक्य...
ब्रिटिशांचा पूल अजूनही भक्कम, आपले रस्ते काही महिन्यांत खड्ड्यात!; राज
ते भेटले असतील तर त्यात... पवार-शिंदे भेटीबाबत कॉंग्रेस नेत्याचं मोठं