Sant Tukaram Maharaj Palkhi : संत तुकाराम महाराज पालखी सोलापुरात दाखल; डोळ्याचं पारणं फेडणारा रिंगण सोहळा
Sant Tukaram Maharaj Palkhi Akluj : संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा तिसरा रिंगण सोहळा आज अकलूजमध्ये पार पडला आहे.
संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातलं तिसरं रिंगण आज सोलापूरच्या अकलूजमध्ये पार पडत आहे. हा सोहळा पाहण्यासाठी वारकऱ्यांसह नागरिकांनी देखील मोठ्या संख्येने गर्दी केली आहे. अकलूजमधल्या माने विद्यालयाच्या प्रांगणात हा सोहळा पार असून संपूर्ण परिसर हा ‘पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकारामा’च्या जायघोषणे दुमदुमून निघाला आहे.
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने आज सोलापुरात प्रवेश केला आहे. जिल्हा प्रवेशानंतर अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात गोल रिंगण पार पडलं. पालखीचं सोलापूर जिल्ह्यातील हे पहिलं गोल रिंगण आहे. यावेळी पताका, हांडे-तुळशी, विणेकरी, मृदंग आणि टाळकरी यांचं रिंगण झालं. त्यानंतर अश्व रिंगण झालं. अश्वाचं रिंगणी धावणे उपस्थितांना याची दही याची डोळा बघणे हे देखील पर्वणीच असते.

मराठा कार्यकर्ते आणि मंत्री सरनाईक यांच्यात शाब्दिक चकमक, पाहा VIDEO

ती कौटुंबिक मुलाखत, त्यावर .. ; मंत्री प्रताप सरनाईकांचा हल्लाबोल

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 24 जुलैला चक्का जाम, बच्चू कडू यांचा इशारा

जुनी म्हण आहे, मुंबईत ठाकरे..; मनोज जरांगेंचं ठाकरेंच्या युतीवर विधान
