Pandharpur Palkhi : इंदापूरात संत तुकोबांच्या पालखीचं दुसरं रिंगण
Indapur Palkhi : जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे दुसरे गोल रिंगण आज इंदापूरला पार पडला.
आषाढी वारी जवळ येत आहे. त्यामुळं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून संतांच्या पालख्या आता पंढरपूरकडे येत आहेत. यंदा 6 जुलैला आषाढी एकादशी साजरी होत आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे दुसरे गोल रिंगण आज इंदापूर मधल्या कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालयाच्या प्रांगणामध्ये पार पडलं. सकाळी इंदापुरात पोहचलेल्या पालखीचं वाजत गाजत स्वागत करण्यात आलं. यावेळी शेकडो वारकऱ्यांनी आणि भाविकांनी रिंगण पाहायला गर्दी केली होती.
हजारो वर्षांपासून चालत निघणाऱ्या वारीचं रुपांतर जेव्हा पालखी सोहळ्यात झाल्यापासून तेव्हापासून रिंगणाची परंपरा सुरू झाली असं म्हटलं जातं. आज टाळ मृदुंगाचा गजर, आसमंतात फडकणाऱ्या पताका, श्री विठूरायांच्या जयघोषात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दुसरं गोल रिंगण पार पडलं. तर या सोहळ्यातील नयनरम्य दृश्य ड्रोनद्वारे टिपण्यात आलं आहे.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

