Palkhi Sohala 2025 : ज्ञानोबा, तुकोबांची पालखीचं दिवेघाटातलं विहंगम दृश्य
Dhive Ghat Palkhi Sohala : ज्ञानोबा, तुकोबांची पालखी दोन दिवसाच्या पुण्यातील मुक्कामानंतर पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे.
दोन दिवसांच्या पुणेकरांच्या उत्साहपूर्ण पाहुणचार घेतल्यानंतर आज संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पुढील प्रवासाला मार्गस्थ झाल्या आहेत. या पवित्र सोहळ्याने पुणे शहरात भक्तीचे वातावरण निर्माण झाले असून वारकरी आणि स्थानिक नागरिकांनी माऊलींच्या पालखीला दर्शन घेतले.
माऊलींच्या पालखी सोबत पुणेकरांनी दिवेघाटापर्यंत मोठ्या संख्येने गर्दी केली. ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषात वारकरी भक्ती भावनेत तल्लीन झाले. या सोहळ्याने शहराला आध्यात्मिक ऊर्जेने भारले आहे. सकाळी भक्तिमय वातावरणात दोन्ही पालख्या मार्गस्थ झाल्या. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज दुपारी 3 वाजता दिवेघाट पार करेल आणि सासवडमध्ये पोहोचेल, तर संत तुकाराम महाराजांची पालखी हडपसरनंतर सोलापूर रस्त्याने लोणी काळभोरकडे मार्गस्थ होणार आहे. दिवेघाटचा हा मार्ग संपूर्ण पालखी मार्गातला अत्यंत महत्वाचा मार्ग समजला जातो. हा संपूर्ण मार्ग आता तुकारामांच्या आणि ज्ञानोबा माऊलींच्या नामघोषणे न्हाऊन निघाला आहे.