संतोष बांगर यांचा ठाकरे गटाच्या नेत्यांवर गंभीर आरोप, म्हणाले, “माझ्याकडून पाच तोळ्याची सोन्याची चैन…”
शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले.संतोष बांगर हे नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतात.शनिवारी पुन्हा बांगर आपल्या वक्तव्याने चर्चेत आले.
नांदेड : शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले.संतोष बांगर हे नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतात. शनिवारी पुन्हा बांगर आपल्या वक्तव्याने चर्चेत आले.”जिल्हाप्रमुख पद पुन्हा पाहिजे असेल तर विनायक राऊत यांना 5 तोळ्याची चैन द्यावी लागले, तर विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आलं होतं. त्याचं बक्षीस देखील मी दिले असल्याचा आरोप बांगर यांनी केला आहे.तर जेवणाचे पैसे सुद्धा मीच दिले होते. त्यामुळे बबन थोरात यांना नांदेडला पाय ठेऊ देऊ नका, खासदारकीला देखील बबन थोरात यांनी फक्त पैसे गोळा करण्याचे काम केले असल्याचा आरोप बांगर यांनी केले. बांगर हे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत नांदेड येथे आयोजित मेळाव्यात बोलत होते. विनायक राऊत आणि बबन थोरात यांनी शिवसेनेची वाट लावली, असे देखील बांगर यावेळी म्हणाले.खासदार विनायक राऊत आणि बबन थोरात यांच्यावर आरोप करताना आमदार बांगर यांनी दोन्ही नेत्यांचा एकेरी उल्लेख करत आरोप केले.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?

