Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणाच्या तपासात आरोपीच्या मित्रांना पोलिसांनी कसं घेतलं? दमानियांचा प्रश्न
Anjali Damania On Dhananjay Munde : असं कोणतं पोलीस स्टेशन आहे जे आरोपीच्या मित्राला पत्र देऊन तू गाडी घेऊन आमच्यासोबत तपासात ये असं सांगतं? असा प्रश्न अंजली दमानिया यांनी उपस्थित केला असून यासाठी धनंजय मुंडे यांचा दबाव असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यासह 10 जणांना सहआरोपी करण्याची मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे. धनंजय मुंडे यांचं सीसीटीव्ही, सीडीआर आणि टॉवर लोकेशन शोधा असंही दमानिया म्हणाल्या आहेत. धनंजय मुंडे यांना या प्रकरणातून वाचवलं जात आहे का? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे. बालाजी तांदळे, शिवलिंग मोराळे, सारंग आंधळे, डॉक्टर वायभसे दाम्पत्य, एसपी बारगळ, पीएसआय राजेश पाटील, पीआय महाजन, पीआय भागवत शेलार आणि एलसीबीचे अधिकारी गीते अशा 10 जणांची नावं दमानिया यांनी घेतली आहे.
इतकंच नाही तर वाल्मिक कराड पोलिसांना शरण गेला तेव्हा शिवलिंग मोराळे नावाचा व्यक्ति त्याला गाडीत घेऊन आला होता. वाल्मिक कराडला सीआयडीच्या ऑफिसला सोड असं मुंडे यांनीच शिवलिंग मोराळे याला सांगितलं होतं असा दावाही दमानिया यांनी केला आहे. धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता असलेला बालाजी तांदळे हा तपासाच्या वेळी पोलिसांच्या सोबत होता यावर देखील अंजली दमानिया यांनी गंभीर आरोप केले आहेत. आरोपीचा मित्रच तपासात सहभागी कसा होऊ शकतो? असा प्रश्न दमानिया यांनी उपस्थित केला आहे. 9 तारखेपासून तांदळे पोलिसांसोबत होता. त्याला 15 तारखेला पत्र देण्यात आलं. असं कोणतं पोलीस स्टेशन आहे जे आरोपीच्या मित्राला पत्र देऊन तू गाडी घेऊन आमच्यासोबत तपासात ये असं सांगतं? हे केवळ धनंजय मुंडे यांचा दबाव होता म्हणून झालं, असा गंभीर आरोप दमानियांनी केला आहे.
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

