Buldhana News : बुलढण्यात वाल्मिक कराड, कृष्णा आंधळे, घुलेचे फोटो जाळले
Santosh Deshmukh Case : सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ बुलढण्यात होळीत आरोपी वाल्मिक कराड, कृष्णा आंधळे, घुलेचे फोटो जाळत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
मस्साजोग येथील माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ बुलढण्यात होळीत आरोपी वाल्मिक कराड, कृष्णा आंधळे, घुलेचे फोटो जाळण्यात आले. एखाद्या मंत्र्याचा मुलगा हरवला तर तो लगेच सापडतो मग अजून कृष्णा आंधळे का नाही सापडला? असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. सरकारने आणि पोलीस प्रशासनाने यावर कठोर पाऊल उचलून आरोपींना कडक शिक्षा करावी आणि तत्काळ कृष्णा अंधलेला अटक करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 3 महीने उलटून गेलेले आहेत. मात्र अद्याप आरोपी कृष्णा आंधळेचा शोध पोलिसांना लागलेला नाही. इतर 7 आरोपींवर सध्या बीडच्या केज कोर्टात खटला दाखल करण्यात आलेला आहे. मात्र एवढ्या दिवसात पोलिसांना आरोपी कृष्णा आंधळेचा ठावठिकाणा कसा लागला नाही? यावर आता प्रश्न उपस्थित केले जात आहे. अशातच होळीनिमित्त होलिका दहनात बुलढण्यातील नागरिकांनी या प्रकरणातील आरोपींचे फोटो जाळून निषेध व्यक्त केला आहे.

संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार

'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब

पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड

'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
