Santosh Deshmukh Case : फरार कृष्णा आंधळे नाशिकमध्ये? सीसीटीव्ही फुटेज आलं समोर
Accuse Krushna Andhale : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे हा गेल्या 3 महिन्यांपासून फरार आहे. त्याला पोलिसांनी फरार घोषित करून त्यांची माहिती देणाऱ्याला बक्षीस जाहीर केलं आहे. त्यानंतर आज कृष्णा आंधळे हा नाशिकमध्ये दिसल्याचं बोललं जात आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याला नाशिकमध्ये बघितलं असल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. गंगाखेड रोड परिसरातील दत्त मंदिर चौकात आंधळे याला पहिलं असल्याचं सांगितलं जात आहे. याची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू करण्यात आलेला आहे. या आधी जानेवारीमध्ये देखील कृष्णा आंधळे दिसल्याची चर्चा होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा नाशिकमध्ये कृष्णा आंधळे दिसल्याच दावा केला जात आहे.
संतोष देशमुख यांची हत्या डिसेंबरमध्ये झाल्यानंतर तेव्हापासून कृष्णा आंधळे फरार आहे. त्याचे साथीदार आणि घटनेचा मास्टर माइंड समजला जाणारा वाल्मिक कराड यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांच्यावर मकोका लावण्यात आलेला असून सध्या या प्रकरणाचा खटला न्यायालयात सुरू आहे. मात्र अद्यापही कृष्णा आंधळे मात्र पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्याला पोलिसांनी फरार घोषित केलेलं आहे. त्याची माहिती देणाऱ्यांना बक्षीस देखील जाहीर झालेलं आहे. अशातच आता पोलिसांना गुंगारा देणारा कृष्णा आंधळे नाशिकमध्ये दिसल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे.

पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड

'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा

मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?

'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत
