Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संतोष देशमुख हत्या प्रकरण: माणूसकीला काळीमा फासला, ८ व्हिडीओ आणि १५ फोटो जाहीर, घटनेचे सेल्फी घेताना आरोपी हसत खिदळत होते...

संतोष देशमुख हत्या प्रकरण: माणूसकीला काळीमा फासला, ८ व्हिडीओ आणि १५ फोटो जाहीर, घटनेचे सेल्फी घेताना आरोपी हसत खिदळत होते…

| Updated on: Mar 04, 2025 | 2:54 PM

संतोष देशमुख यांच्या तोंडावर लघवी देखील करताना आरोपी दिसत आहेत. हे १५ व्हिडीओ आणि ८ फोटो पाहून दगडालाही अश्रू फुटतील इतके भयानक कृत्य आरोपींनी केल्याचे स्पष्ट झाले आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर देशभर खळबळ उडाली. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच देशमुख यांची १० डिसेंबर २०२४ रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती, त्यापूर्वी त्याचे अपहरण करण्यात आले होते. या हत्येनंतर विधीमंडळात भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी या घटनेचा वृत्तांत सर्व आमदारांसमोर मांडला तेव्हा अनेकांचे डोळ्यातून अश्रु ओघळले. अशा महाराष्ट्राच्या पुरोगामी प्रतिमेला तडा जाणाऱ्या घटनेनंतर या प्रकरणात गेले तीन महिने आरोप आणि प्रत्यारोपाने राज्यात दोन्ही समाजात तेढ निर्माण झाली. या प्रकरणात अखेर मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यासह नऊ आरोपींना मोक्का कायद्याखाली अटक देखील झाली. त्यानंतर कोर्टात या सर्व हत्याकांडाचा सूत्र वाल्मिक कराड हाच असल्याचे उघडकीस आले. कोर्टात या प्रकरणात दाखल केलेल्या आरोपपत्रात अखेर ही हत्या कशी झाले त्याच्या 15 व्हिडीओ आणि 8 फोटो पुरावा सादर करण्यात आले आहेत. या फोटोंना पाहून आरोपींनी हैवानालाही लाजवले असे कृत्य केल्याचे स्पष्ट झाले आहे.जयराम चाटे, कृष्णा आंधळे, महेश केदार, सुदर्शन घुले, प्रतिक घुले यांनी हैवानाला लाजवेल असे काम केले आहे.

Published on: Mar 03, 2025 09:38 PM