‘माझं लेकरू…’, सुप्रिया सुळेंसमोर सरपंच संतोष देशमुखांच्या आईचा कंठ दाटला अन् अश्रू अनावर
देशमुख कुटुंबियांचे सांत्वन कऱण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे गेल्या होत्या. तेव्हा त्या सुद्धा भावूक झाल्या. त्यांनी देशमुख यांच्या आईला आधार देण्याचा प्रयत्न केला. यावेळी ग्रामस्थ संतप्त झाले होते.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर देशमुख कुटुंबियांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी भेट घेतली. यावेळी सुप्रिया सुळेंनी देशमुख कुटुंबियांचे सांत्वन केल्याचे पाहायला मिळाले. इतकेच नाहीतर ‘मी तुमच्यासाठी लढेन. मी तुम्हाला, तुमच्या मुलाला आणि नातवंडांना न्याय मिळवून देईन, हा माझा शब्द आहे.’, असं वचनदेखील सुप्रिया सुळे यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला दिलं. यादरम्यान, सुप्रिया सुळेंसमोर संतोष देशमुखांच्या आईचा कंठ दाटून आल्याचे पाहायला मिळाले. सुप्रिया सुळे यांनी देशमुखांच्या आईंशी भावनिक संवाद साधताना त्यांच्या दाटलेल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. माझं लेकरू कुठं शोधू? मारेकऱ्यांना लेकरं, आई-वडिल नाहीत का? एकटं माणूस पाहून मारलं, त्यांना काहीच वाटलं नाही का? ज्या दिवशी हत्या झाली, त्यादिवशी मी त्याची वाट पाहत होते. स्वयंपाक केलेला होता. त्याला फोन केला. पाचच रिंग वाजल्या आणि नंतर फोन बंद झाला. माझ्या मुलाचा चेहरा सुद्धा पाहु दिला नाही, असे सांगतानाच त्या आईला अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. बघा व्हिडीओ…

IPL बघणं महागात पडलं; एसटी प्रशासनाने चालकाला थेट बडतर्फच केलं

'.. तर गावबंदी करू', मल्हार सर्टिफिकेटला जेजूरीच्या ग्रामस्थांचा विरोध

'मला शरद पवारांनी मंत्री केलं..', खतगावकरांचं अजितदादांसमोरच विधान

'तो आमचा विठ्ठल..' धाराशीवात खोक्याच्या समर्थनार्थ आदिवासी समाज एकवटला
