Supriya Sule Video : ‘खरोखर माफ करा, पण मी वचन देते…’, सुप्रिया सुळेंनी मस्साजोगमध्ये जात देशमुख कुटुंबाला काय दिला शब्द?
माझं लेकरू कुठं शोधू? मारेकऱ्यांना लेकरं, आई-वडिल नाहीत का? एकटं माणूस पाहून मारलं, त्यांना काहीच वाटलं नाही का? असा सवाल करत संतोष देशमुख यांच्या आईने सुप्रिया सुळेंसमोरच हंबरडा फोडल्याचे पाहायला मिळाले.
बीडच्या केजमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर देशमुख कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आज मस्साजोगमध्ये दाखल झाल्यात. यावेळी सुप्रिया सुळेंसोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि इतर नेते देखील उपस्थित होते. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन अडीच महिने उलटले. तरी देखील सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले नसून एक आरोपी फरार आहे. तर एका आरोपीला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जातेय, असा आरोप केला जातोय. दरम्यान, याप्रकरणी कासवगतीने सुरू असलेल्या तपासावर गावकऱ्यांसह देशमुख कुटुंब संताप व्यक्त करत आहे. अशातच सुप्रिया सुळे यांनी देशमुख कुटुंबीयांची भेट घेत त्यांच्या भावना जाणून घेतल्या. ‘मी तुमच्यासाठी लढेन. मी तुम्हाला, तुमच्या मुलाला आणि नातवंडांना न्याय मिळवून देईन, हा माझा शब्द आहे.’, असं वचनच सुप्रिया सुळे यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला दिलं.