AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माझा राम गेला…आईच्या हंबरड्याने मस्साजोगमध्ये स्मशान शांतता, सुप्रिया सुळे भावूक

Massajog Sarpanch Santosh Deshmukh Case : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन अडीच महिने उलटले. पण एक आरोपी फरार तर एका आरोपीला व्हीआयपी ट्रीटमेंट, असा आरोप करण्यात येत आहे.

माझा राम गेला...आईच्या हंबरड्याने मस्साजोगमध्ये स्मशान शांतता, सुप्रिया सुळे भावूक
माझा राम गेला
| Updated on: Feb 18, 2025 | 10:35 AM
Share

माझा राम गेला, एकटा लक्ष्मण कुठवर धावणार? असा हंबरडा संतोष देशमुख यांच्या आईने फोडताच उपस्थित सर्वच जण गहिवरून गेले. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे सुद्धा भावूक झाल्या. त्यांनी देशमुख यांच्या आईला आधार देण्याचा प्रयत्न केला. यावेळी ग्रामस्थ संतप्त झाले होते. आरोपीला देण्यात येणाऱ्या व्हीआयपी ट्रीटमेंट, एक आरोपी फरार, तर संथगतीने होणाऱ्या तपासावर गावकऱ्यांनी तोंडसुख घेतले. त्यांच्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.

माझं लेकरू कुठं शोधू?

माझं लेकरू कुठं शोधू? मारेकऱ्यांना लेकरं, आई-वडिल नाहीत का? एकटं माणूस पाहून मारलं, त्यांना काहीच वाटलं नाही का? असा सवाल करत संतोष देशमुख यांच्या आईने हंबरडा फोडला. त्यांच्या आक्रोशाने सर्वांचे मन हेलावले. ज्या दिवशी हत्या झाली, त्यादिवशी मी त्याची वाट पाहत होते. स्वयंपाक केलेला होता. त्याला फोन केला. पाचच रिंग वाजल्या आणि नंतर फोन बंद झाला, असे सांगतानाच त्या माऊलीचा कंठ दाटून आला, घळाघळा अश्रू आले.

माझ्या मुलाचा चेहरा पण पाहु दिला नाही

माझ्या मुलाचा चेहरा सुद्धा पाहु दिला नाही, असे संतोष देशमुख यांच्या आई म्हणाल्या. पीएसआय राजेश पाटील हा खरा आरोपी असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. आरोपींनी वॉचमनला मारहाण केली. अशोक मोहितेला आरोपींच्या मित्रांनी मारहाण केली,असे धनंजय देशमुख म्हणाले. तर पीएसआय पाटील यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.

मी तुमच्यासाठी लढेन

देशमुख कुटुंबाला 69 दिवसांपासून न्याय मिळाला नाही. माणुसकीच्या नात्याने सुप्रिया सुळे हा लढा लढणार आहे, असे सुप्रिया सुळे यांनी जाहीर केले. आईचं-बहिणीचं दुःख समजू शकते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत आहेत. त्यांच्याकडून लवकर न्यायाची अपेक्षा होती. त्यांनी वरतून एक मोठा सिग्नल द्यायला पाहिजे होते. हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या संस्काराने चालेल, हे अपेक्षित आहे. मी न्यायासाठी मुख्यमंत्र्यांकडे पदर पसरवले, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

अमित शाह यांच्याकडे मागणी

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी मागणी केल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली. खासदार बजरंग सोनवणे आणि आपण अमित शाह यांची भेट घेतल्याचे सुळे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. आरोपींना फाशीची शिक्षा झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे सोनवणे म्हणाले. या लोकांची सत्तेची मस्ती उतरल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. येथील गुंडगिरी थांबलीच पाहिजे, असे त्या म्हणाल्या.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...