Walmik Karad CCTV Video : कराड पुण्यात सरेंडर होण्यापूर्वी बीडमध्ये बिनधास्त फिरला पण कोणाच्या हाती नाही, बघा नवं CCTV आलं समोर

Walmik Karad CCTV Video : कराड पुण्यात सरेंडर होण्यापूर्वी बीडमध्ये बिनधास्त फिरला पण कोणाच्या हाती नाही, बघा नवं CCTV आलं समोर

| Updated on: Jan 24, 2025 | 11:54 AM

सरेंडर होण्यापूर्वीच वाल्मिक कराड हा बीडमधून पुण्यात आला. याचे पुरावे सीसीटीव्हमध्ये कैद झालेत. शोध घेऊन देखील बीड पोलीस आणि सीआयडीला कराड सापडला नव्हता. मात्र ३१ डिसेंबरला सरेंडर होण्यापूर्वी ३० डिसेंबरला कराड हा बीडला होता.

सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड ३१ डिसेंबरला पुण्यात सीआयडीसमोर सरेंडर झाला. मात्र त्यापूर्वी तो कसा बिनधास्त फिरत होता आणि बीड पोलीस आणि सीआयडीचे अधिकारी कसे खाली हात होते त्याचे नवे पुरावे हे सीसीटीव्ही फुटेजमधून समोर येतायत. ३१ डिसेंबरला सरेंडर होण्यापूर्वी ३० डिसेंबरला कराड बीडला होता. तर मांजरसुंबा इथे एका हॉटेलवर जेवण केलं. मांजरसुंब्यातच पेट्रोल पंपावर डिझेलही भरलं. धाराशीवच्या पारगाव टोल नाक्यावर रात्री १.३६ वाजता टोल भरला. पण पोलिसांच्या कराड हाती लागला नाही. ३० डिसेंबरच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन पांढऱ्या आणि एक काळ्या रंगाची गाडी दिसतेय. तर रात्रीचा प्रवास करून वाल्मिक कराड सकाळी पुण्यात पोहोचला. त्यानंतर पावणे १२ च्या सुमारास वाल्मिक कराडने व्हिडीओ शूट करून संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोप फेटाळले. त्यानंतर १५ मिनिटातच साआयडीच्या ऑफिसमध्ये सरेंडर झाला आणि पुढे काय झालं? बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट….

Published on: Jan 24, 2025 11:54 AM