Pune Pregnant Death : ‘ससून’चा रिपोर्ट मॅनेज? भिसे कुटुंबावरच फोडलं खापर? ‘दीनानाथ’च्या दिरंगाईवर मौन, काय आलं समोर?
ससूनचा रिपोर्ट मॅनेज असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. मंगेशकर रुग्णालयामध्ये डिपॉझिट मागितलं गेलं की नाही यावर रिपोर्टमध्ये मौन आहे. खुद रुग्णालयाने डिपॉझिट मागितल्याचं कबूल करूनसुद्धा ससूनच्या अहवालामध्ये त्याचा साधा उल्लेखही नाही.
ससून रुग्णालयाच्या चौकशी समितीचा अहवाल आज पुणे पोलिसांकडे सादर करण्यात आला. या अहवालातून आयव्हीएफ सेंटर आणि भिसे कुटुंबावरच खापर फोडल्याचे दिसतंय. तर पुणे पोलिसांनी अहवालातील चार मुद्द्यांवर पुन्हा एकदा ससूनकडून अभिप्राय मागवला आहे.
तनिषा भिसेंच्या मृत्यूप्रकरणी एकूण चार समिती गठीत झाल्या होत्या. एक आरोग्य विभागाकडून, दुसरी धर्मादाय आयुक्ताकडून, तिसरी माता मृत्यू समिती पुणे पालिकेकडून आणि चौथी समिती ससूनच्या रुग्णालयाद्वारे… यापैकी पहिल्याच अर्थात सरकारने नेमलेल्या आरोग्य समितीने मंगेशकर रुग्णालयावर थपका ठेवल्याची माहिती खुद रुपाली चाकणकरांनीच दिली होती. त्यावेळेस गुन्हा दाखल होणं अपेक्षित असूनही ससूनचा अहवाल आल्यावर गुन्हा दाखल होईल असं सरकारकडून सांगण्यात आलं.
धक्कादायक म्हणजे आलेल्या ससूनच्या अहवालात मंगेशकर रुग्णालयात झालेली दिरंगाईचा उल्लेखच करण्यात आलेला नाही. अप्रत्यक्षपणे या अहवालामध्ये भिसेंच्या मृत्यूचं कारण आयव्हीएफ सेंटर आणि स्वतः भिसेंच्या कुटुंबियांना ठरवलं गेलंय. ससून अहवालाच्या निष्कर्षानुसार इंदिरा आयव्हीएफमध्ये तब्येतीमध्ये सुधारणा होत नसताना त्यांनी रुग्णालयामध्ये पाठवणं गरजेचं होतं. अती जोखमीच्या स्थितीमध्ये मल्टी स्पेशालिटी रुग्णालयामध्ये नेण्याची गरज होती, पण तसं केलं गेलं नाही. मंगेशकर रुग्णालयामध्ये पाच तास थांबवलं होतं. इथे पैसे घेतले की नाही याची चौकशी आरोग्य उपसंचालकांनी केलीये. या तिन्ही मुद्द्यांवर नजर टाकली तर ससूनचा अहवाल डॉ. घैसास आणि मंगेशकर रुग्णालयामधल्या दिरंगाईवर चकार शब्दही काढत नाही. त्याउलट आयव्हीएफ मध्ये दिरंगाई झाली आणि मल्टी स्पेशालिटी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं नाही असं अहवालामध्ये म्हटलं गेलंय. पण मंगेशकर रुग्णालय मल्टी स्पेशालिटी रुग्णालयचं आहे तिथे साडेपाच तास रुग्णाला थांबवलं गेलं याबद्दल अहवालामध्ये उल्लेख का नाही? हे कोडं असल्याचे दिसतंय.

ऑपरेशन सिंदूर आता फक्त स्थगित केलंय... पंतप्रधान मोदींचं मोठं विधान

Operation Sindoor हे फक्त नाव नाही तर... पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

ऑपरेशन सिंदूरवर पहिल्यांदाच बोलताना मोदींकडून भारतीय लष्कराला सॅल्यूट

असीम मुनीरनं असं काही केलं की पाकिस्तानी लोकांनाही वाटेल त्याची लाज
