AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Satara | टोल भरण्याच्या कारणावरुन टोलनाक्यावर वाद, मारहाण; तासवडे टोलनाक्यावरील घटना

Satara | टोल भरण्याच्या कारणावरुन टोलनाक्यावर वाद, मारहाण; तासवडे टोलनाक्यावरील घटना

| Edited By: | Updated on: Oct 27, 2021 | 10:09 AM
Share

बंगळुरु महामार्गावर (Banglore Highway) टोल भरण्याच्या कारणावरुन कराड जवळ असणाऱ्या तासवडे टोलनाक्यावर 12 ते 15 जणांनी सहा जणांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ करत धमकी दिल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली आहे. कोल्हापूर येथून साखरपुड्याचा कार्यक्रम झाल्यानंतर पुण्याच्या दिशेने निघालेल्या ट्रव्हल्सचा टोल भरण्यावरुन हा राडा झाला असल्याची माहिती आहे.

बंगळुरु महामार्गावर (Banglore Highway) टोल भरण्याच्या कारणावरुन कराड जवळ असणाऱ्या तासवडे टोलनाक्यावर 12 ते 15 जणांनी सहा जणांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ करत धमकी दिल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली आहे. कोल्हापूर येथून साखरपुड्याचा कार्यक्रम झाल्यानंतर पुण्याच्या दिशेने निघालेल्या ट्रव्हल्सचा टोल भरण्यावरुन हा राडा झाला असल्याची माहिती आहे. फास्टॅग स्कॅनिंग होत नसल्याने बाचाबाचीतून हा वाद मोठा झाल्याची माहिती आहे.

26 तारखेच्या पहाटे टोल नाक्यावरील झालेल्या या राड्याचा व्हिडीओ समाज माध्यमातून मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. याबाबतची तक्रार तळबीड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

Published on: Oct 27, 2021 09:36 AM