Phaltan Doctor Death : ती आली, तिनं रूम 114 चं दार उघडलं अन्… मृत डॉक्टरची अशी झाली हॉटेलमध्ये एन्ट्री, CCTV समोर
फलटणमधील डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मृत डॉक्टर तरुणी हॉटेलमध्ये प्रवेश करतानाचा सीसीटीव्ही फुटेज आता सार्वजनिक झाला आहे. हॉटेल मालकाने आरोप-प्रत्यारोप झाल्यानंतर हे फुटेज जाहीर केले असून, प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. यामुळे या घटनेभोवतीच्या चर्चांना नवी दिशा मिळाली आहे.
फलटणमधील डॉक्टर महिलेच्या आत्महत्येप्रकरणी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मृत डॉक्टर तरुणी हॉटेलमध्ये प्रवेश करत असतानाचे सीसीटीव्ही फुटेज आता सार्वजनिक झाले आहे. हॉटेल मालकाने त्यांच्यावरील आरोपानंतर हे फुटेज जाहीर केल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणात आत्महत्येच्या घटनेनंतर अनेकांनी आरोप-प्रत्यारोप सुरू केले होते. यामध्ये सुषमा अंधारे यांनी स्थानिक हॉटेल व्यावसायिकांवर विविध आरोप केले होते.
पीडित डॉक्टर महिला घरात असताना ती हॉटेलमध्ये कशी आली, तिला रात्री उशिरा खोली कशी दिली गेली आणि तिला बाहेरून आणून मारले तर नसेल ना, असे अनेक सवाल त्यांनी उपस्थित केले होते. या आरोपानंतर हॉटेल मालकाने स्वतः सीसीटीव्ही फुटेज जाहीर केले आहे. यामध्ये मृत डॉक्टर हॉटेलमध्ये प्रवेश करताना आणि त्यानंतर तिच्या खोलीत जाताना दिसत आहे. हॉटेल मालकाने या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

