Sautada Waterfall : सौताडाचा धबधबा तुम्ही पाहिलाय? नसेल तर ड्रोनद्वारे काळजात भरणारा नजारा एकदा बघाच
बीड आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या या गावात धबधब्याचे निसर्गरम्य आणि विहंगम चित्र पाहण्यासाठी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळत असते. अशातच सौताडामधील रामेश्वर धबधबा पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. बघा ड्रोनने टिपलेली खास दृश्य
बीड जिल्ह्यातील रामेश्वर धबधबा पूर्ण क्षमतेने आता प्रवाहित झाला आहे. सौताडा येथील रामेश्वर धबधबा ड्रोनने खास दृश्य टिपली आहेत. तुम्ही जर या पर्यटनस्थळाला कधी भेट दिली नसेल तर एकदा नक्कीच जायला हवं असं हे ठिकाण आहे. बीड जिल्ह्यातील निसर्गरम्य ठिकाण म्हणून सौताडा येथील रामेश्वर धबधबा परिचित आहे. या धबधब्याची खूप चर्चा पर्यटकांमध्ये असते. तीनशे फुटाहूनही जास्त उंचावरून हा धबधबा कोसळतो त्यामुळे याची पर्यटकाना विशेष भुरळ असते. सौताडामधील हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. या धबधब्याचे मनमोहक आणि विहंगम दृश्य नेहमी पर्यटकांना आकर्षित करत असते. पाचशे फूट खोल दरीत श्रीक्षेत्र रामेश्वर तीर्थस्थळ असून येथील धबधब्याचा आवाज सकाळी दोन किलोमीटर अंतरापर्यंत ऐकायला येतो. मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखले जाणारे श्रीक्षेत्र रामेश्वर हे तीर्थस्थळ सौताडा जामखेडपासून अकरा किलोमीटर, अहमदनगरपासून नव्वद किलोमीटर तर बीडपासून पंचावन्न किलोमीटर अंतरावर आहे.
Published on: Aug 19, 2024 04:40 PM
खरातच्या टेबलवर महिला देवाच्या नावाखाली... रुपाली ठोंबरेंना राग अनावर,
पंतप्रधान मोदी म्हणजे...एकनाथ शिंदेंचा शायराना अंदाज; केल तोंडभरून कौत
एकच खळबळ! काँग्रेसच्या अत्यंत विश्वासू नेत्याचा अर्ज बाद झाल्याने...
ज्याची भीती तेच घडलं! पश्चिम बंगालमध्ये मोठा उलटफेर, शत्रुघ्न सिन्हा
