Mahad Rain | सावित्री नदीने ओलांडली धोक्याची पातळी, महाड शहरात 6 ते 7 फूट पाणी

पावसाच्या संततधारेमुळे  सावित्री नदीने ओलांडली धोक्याची पातळी ओलांडली असून, महाड शहरात 6 ते 7 फूट पाणी भरले आहे.

पावसाच्या संततधारेमुळे  सावित्री नदीने ओलांडली धोक्याची पातळी ओलांडली असून, महाड शहरात 6 ते 7 फूट पाणी भरले आहे. दरम्यान, महाड शहरात पावसाचा जोर दिसत आहे. तटरक्षक दलाची 2 पथके महाडकडे रवाना झाली आहेत. कोलाड येथील महेश सानप यांचे बचाव पथकही महाडला रवाना झाले आहे. दुसरीकडे, नागोठणे शहर जलयम झाले असून मरीआई मंदीर, बाजारपेठ, एसटी स्थानक परिसरासह शहरात अनेक ठिकाणी पाणी भरले आहे.

पोलादपूर शहरात जुन्या महाबळेश्वर रस्त्यावर पाणी आले आहे. पोलादपूर सिद्धेश्वर अळीमध्ये बुधवारी रात्री घरात दोन फुटांपर्यंत पाणी आले होते, पण आता पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र पावसाचा जोर पुन्हा वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI