Thane News : मासिक पाळीचा संशय; विद्यार्थिनींना विवस्त्र करून तपासलं; मुख्याध्यापिकेला अटक
Thane Shahapur News : शहापुरातील एका प्रसिद्ध इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
शहापुरातील एका प्रसिद्ध इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इयत्ता 5 वी ते 10 वीच्या 10 ते 12 विद्यार्थिनींना मासिक पाळी तपासण्याच्या नावाखाली विवस्त्र करून छळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पालकांच्या तक्रारीनंतर शहापूर पोलिसांनी मुख्याध्यापिकेविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे असून अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या शाळेत सुमारे 300 मुली शिक्षण घेतात. 8 जुलै रोजी सकाळी 10 ते 12 वाजेच्या सुमारास मुख्याध्यापिकेने सर्व मुलींना शाळेच्या सभागृहात बोलावले. त्यानंतर बाथरूमच्या भिंती आणि फरशीवरील रक्ताच्या डागांचे फोटो प्रोजेक्टरवर दाखवत मुलींना त्यांच्या मासिक पाळीविषयी विचारणा केली. ज्या मुलींना मासिक पाळी आली होती, त्यांचे हाताचे ठसे घेण्याचे आदेश देण्यात आले. तसेच, ज्या मुलींना मासिक पाळी आली नव्हती, त्यांना बाथरूममध्ये नेऊन कपडे काढून तपासणी करण्याचे निर्देश महिला कर्मचाऱ्यांना देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. या गंभीर प्रकरणामुळे मुख्याध्यापिकेवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...

