Latur | लातूरमध्ये शाळा सुरू, पहिल्याच दिवशी विद्यार्थांची 100 टक्के उपस्थिती

लातूर जिल्ह्यातही  आज पासून पहिली ते दहावीच्या जवळपास दोन हजार शाळांना सुरुवात झाली, विशेष म्हणजे शाळेच्या पहिल्याच दिवशी बहुतांश शाळांमध्ये शंभर टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती पहायला  मिळाली.

लातूर जिल्ह्यातही  आज पासून पहिली ते दहावीच्या जवळपास दोन हजार शाळांना सुरुवात झाली, विशेष म्हणजे शाळेच्या पहिल्याच दिवशी बहुतांश शाळांमध्ये शंभर टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती पहायला  मिळाली.  शिक्षण विभागाच्या  सुचानां प्रमाणे प्रत्येक शाळेत मास्क -स्यानिटायझर ,सुरक्षित अंतर पाळण्यात येत होते. साधारण दोन वर्षा  नंतर शहरी भागातल्या प्राथमिक  शाळांना सुरुवात झाल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत होता . शाळेच्या प्रवेशद्वारावर थांबून शिक्षकांनी मुलांना गुलाबपुष्प देत त्यांचं स्वागत केले. लातूर जिल्ह्यात पहिली ते सातवी पर्यंतच्या 906 शाळा आहेत .

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI